Press "Enter" to skip to content

तुलसी ग्लोबल लॉजिस्टिक्स कडून राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम आलेल्या महेंद्र पाटीलचा सत्कार

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

वर्डालय मीडिया अँड पब्लिकेशन हाऊसने राज्यस्तरीय पत्रलेलखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 500 हुन जास्त पत्र त्यांच्या या स्पर्धेत सहभागी झाली होती. याच स्पर्धेत उरण तालुक्यातील आवरे गावातील महेंद्र गुरुनाथ पाटील याचा प्रथम क्रमांक आला. वाचकांच्या आवडीचे पत्र म्हणून त्याला पहिलं पारितोषिक मिळालं.

विजेत्याचे नाव समोर येताच महेंद्र पाटील याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. अनेक मान्यवरांनी त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या शुभेच्छां दिल्या. महाराष्ट्रातून होणाऱ्या स्पर्धेत आपल्या विभागातील मुलगा प्रथम येणे ही खूप गर्वाची बाब आहे असे महेंद्रच्या विभागातील लोकांचे मत आहे.

महेंद्र गुरुनाथ पाटील ने नकार दिलेल्या प्रेयसीस पत्र ह्या विषयावर पत्र लिहिले होते. वाचकाच्या पसंतीचे पत्र म्हणून त्याला पहिलं पारितोषिक मिळालं. हे पारितोषिक कविवर्य मा. इंद्रजित भालेराव सर (सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक ) यांच्याकडून मिळाले.

याच स्पर्धेचे औचित्य साधून तुलसी ग्लोबल लॉजिस्टिक्स PVT LTD कंपनीने त्याचा सत्कार केला. यावेळी कंपनीचे मॅनेजर संदीप ठाकूर आणि त्यांची टीम प्रशांत भोईर, जगदीश म्हात्रे, प्रशांत बसवंत, गणेश ठाकूर, राजेश म्हात्रे, अक्षय वाळुंज, सुशांत देवडिगा, जयेश गावंड, ऋषिकेश मोहिते, राकेश मोकल, ऋषिकेश लेंढे, महेश शेडगे नितेश वाजेकर, विशाल मडियार, संतोष म्हसकर, रोशन कोळी, सुभाष मुखर्जी आणि धिरेंद्र पांडे उपस्थित होते.

महेंद्र पाटील बद्दल सांगायचं झालं तर तो एक उत्तम लेखक आहे हे खूप कमी लोकांना माहीत आहे. त्याने आतापर्यंत 800 हून अधिक कथांचे लेखन केलं आहे. पाटीलजी म्हणून सोशल मीडियावर तो लोकप्रिय आहे. त्याच्या स्वत:च्या अश्या दोन वेबसाईट आहेत तिथे तो लिखाण करतो. www.readkatha.com आणि www.patiljee.in. इथे तो रोज नवनवीन कथा पोस्ट करत असतो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.