Press "Enter" to skip to content

मनसे रायगड जिल्हा कामगार संघटकपदी सत्यवान भगत

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान पंढरीनाथ भगत यांची नियुक्ती रायगड जिल्हा मराठी कामगार सेनेच्या जिल्हा कामगार संघटक पदी करण्यात आली आहे.

सत्यवान पंढरीनाथ भगत यांचा पिंड समाजसेवेचा असून त्यांनी आपल्या कार्यातून अनेक गोरगरिबांना , कामगारा न्याय मिळवून दिला आहे. मनसेचे ते एकनिष्ठ, कट्टर, प्रामाणिक कार्यकर्ते असून मनसेचा उरण पनवेल व रायगड जिल्ह्यात प्रचार व प्रसार करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची नियुक्ती रायगड जिल्ह्याचा कामगार संघटक पदी केली.


सदर नियुक्तीपत्र कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नाविक सेनेचे उपाध्यक्ष तथा मराठी कामगार सेनेचे उपाध्यक्ष संदेश ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ, अमोल बोचरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी नवनियुक्त रायगड जिल्हा कामगार संघटक सत्यवान भगत यांनी “माननीय राज साहेब यांच्या आदेशांचे, विचाराचे प्रामाणिकपणे पालन करून संघटना वाढविण्यासाठी तसेच गोरगरिबांना न्याय देण्यासाठी मी रात्रंदिवस झटेन असे मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.

आज मराठी कामगारांना खंबीर नेतृत्वाची गरज असून त्याची विश्वासार्हता जपणे सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. या दृष्टीकोनातून सत्यवान भगत यांची रायगड जिल्हा कामगार संघटक म्हणून केलेल्या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून या नियुक्तीमुळे त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.