Press "Enter" to skip to content

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य संस्थेच्या कार्याचा साई चरणी गौरव

सिटी बेल | आवरे |

आवरे गाव म्हणजे धार्मिक परंपरा , उत्सव, भक्तिमय वातावरण हे जणू समीकरण !! आवरे गावातील साई मंदिर हे सर्व साई भक्तांचं श्रद्धा स्थान होय. साई मंदिरात दर गुरुवारी नित्यनेमाने साई आरती, पूजा, अभिषेक आणि साई भक्ती परंपरा ही जणू प्रत्येक साई भक्तांच्या माथी परंपरा ही चालू आहे.

सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य बहुमोल कामगिरी करणारी संस्था स्वतःच स्व पण विसरून अगदी दुसऱ्याच्या विषयी सहानभूती जबाबदारी ची जाणीव ठेवत सामाजिक क्षेत्रातील आपलं वावर कार्यरत ठेवत अल्पावधीतच आपल्या नावाचा ठसा उंमटवीत अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. मग ते कोरोना कालावधीत अन्न धान्य वाटप असेल , रक्तदान शिबिर असेल, पर्यावरण संवर्धन असेल, पिरवाडी बिच साफ सफाई असेल, शैक्षणिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव असेल किंवा महाड पुरग्रस्त यांना अगदी उपयुक्त अशी मदत असेल.

ही संपूर्ण कामगिरी पार पडणारे व्यक्तिमत्त्व श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील आणि संपूर्ण टीम आज साई आरती साठी उपस्थित राहिली व साई आरतीचा बहुमोल असा सन्मान साई आरतीची ओवाळणी ही सुदेश पाटील यांच्या हस्ते झाली.

सदर प्रसंगी साईभक्त सुदेश पाटील, सौ. रेश्मा सुदेश पाटील , विकी पाटील, सौ. अक्षता पाटील, रवी म्हात्रे, सुरज पवार, हेमंत कोळी, शुभम ठाकूर तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक महाराष्ट्र राज्य संस्था ची संपूर्ण टीम उपस्थित होते. साई भक्त व साई प्रतिष्ठान आवरे चे अध्यक्ष गुरू गावंड यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज संस्थेच्या कार्यचा यथोचित गौरव हा साई चरणी करण्यात आला. साई आरती चा महिमा अगाध आहे !!!!

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.