Press "Enter" to skip to content

मोहोपाड्यात अंगणवाडी सेविकांकडून पोषण अभियान

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी पाताळगंगा विभागात लोहोप दोन आणि मोहोपाडा रिस अंगणवाडी केंद्राच्या वतीने वासांबे मोहोपाडा हद्दीत परिसरातील अंगणवाडी सेविका आणि एएनएम,आशावर्कंर यांच्या वतीने पोषण अभियान राबविण्यात येत आहे.यासाठी वासांबे मोहोपाडा परिसरातील अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पोषण आहारासंदर्भांत जनजागृती करीत आहेत.यासाठी अंगणवाडी सेविका ,आशावर्कंर यांनी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत कार्यालयापासून पोषण अभियानाला सुरुवात केली.

यावेळी सरपंच ताई पुंडलिक पवार, ग्रामविकास अधिकारी सुधीर तोंडळेकर, अंगणवाडी सेविका वंदना जाधव,शारदा खाने, मनिषा जाधव आदी उपस्थित होत्या.पोषण अभियानअंतर्गत सहा वर्षांखालील मुलांचे कुपोषणाचे व बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे.6 ते 56 महिने वयोगटातील बालकांमधील रक्तक्षमाचे प्रमाण कमी करणे,15 ते 59 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्तक्षमाचे प्रमाण कमी करणे तसे जन्मत कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करणे आदी पोषण अभियानातून अंगणवाडी सेविका,आशावर्कंर व एएनएम जनजागृती करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.