सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे.कोरोना संसर्गं कधी,कुठे,कसे, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतिषी वा तज्ञही सांगू न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.यातच आपली वडगाव ग्रामपंचायत कोरोनामुक्त असावी, यासाठी सरपंच गौरी महादेव गडगे यांनी कंबर कसली आहे.सरपंच गौरी गडगे यांनी ग्रामपंचायत हद्दीत लसीकरण व्हावे यासाठी एस एच केळकर कंपनीला पत्राद्वारे मागणी केली.अखेर एस एच केळकर कंपनीने आपल्या फंडातून वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना लसीकरण देण्याचे मान्य केले.
यानुसार वडगाव येथील राजिप शाळेत नागरिकांना मोफत कोव्हिड लसीकरण करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतला.यावेळी सरपंच गौरी महादेव गडगे, कल्पना मदन ठोंबरे, राजेश कान्हा पाटील, शिवाजी शिंदे, संतोष गडगे उपस्थित होते.दरम्यान सरपंच गौरी गडगे यांनी एस एच केळकर कंपनीचे व्यवस्थापक सावंत यांचे आभार मानले.
Be First to Comment