Press "Enter" to skip to content

विजय – विकास यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

उरण तालुक्यातील कोप्रोली आरोग्य केंद्र येथे ७ फॅन भेट

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य विजय भोईर व ब्लू स्टार सेक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्व्हिसेसचे प्रोपायटर विकास भोईर यां दोन्ही भावांचा दिनांक 22/9/2021 रोजी वाढदिवस असल्याने या दोन्ही समाजसेवी व्यक्तिमत्वचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.


विजय विकास यांचा यंदा 42 वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.उरण तालुक्यातील कोप्रोली आरोग्य केंद्र येथे विजय भोईर आणि विकास भोईर यांनी सामाजिक बांधिलकी जपत ७ फॅन भेट म्हणून दिली.तसेच चिरनेर येथे कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर, नर्स, हॉस्पिटल स्टाफचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

गोर गरिबांना नेहमी मदत करणाऱ्या विजय भोईर व विकास भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, हितचिंतकांनी, मित्र परिवार, नातेवाईकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तर अनेकांनी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.