Press "Enter" to skip to content

जयवंत पाटील यांचा प्रशासनाला बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

सिडको प्रशासनाने स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांवर केलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी व सिडको संबंधित वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच विविध मागण्यासाठी बोकडवीरा गावचे रहिवासी तथा स्थानिक सिडको प्रकल्पग्रस्त जयवंत हिराजी पाटील यांनी सिडको प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय , पोलिस आयुक्तालय नवी मुंबई, तहसीलदार उरण,गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण,विशेष भूसंपादन अधिकारी मेट्रो सेंटर उरण,आयुक्त कोकण विभाग,उरण पोलीस ठाणे येथे पत्रव्यवहार करून उरण पोलीस ठाणे येथे दिनांक 4/10/2021 पासून बेमुदत साखळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


सिडकोने विविध समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवले असून विविध समस्यांना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी हे सर्वस्वी जबाबदार आहेत म्हणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, जयवंत हिराजी पाटील यांच्या मालकीची स्वतंत्र 66 गुंठे संपादित जमीनी पोटी किमान 80 लाख रुपये प्रती गुंठे याप्रमाणे 52 कोटी रुपये मोबदला देऊन समस्या त्वरित मार्गी लावावे हि प्रमुख मागणी असून यासह विविध मागण्यांसाठी दि 4/10/2021 पासून उरण पोलीस ठाणे समोर सिडकोचे प्रकल्पग्रस्त तथा बोकडवीरा गावचे रहिवाशी जयवंत हिराजी पाटील हे बेमुदत साखळी आंदोलन करणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.