मुरूड तालुक्यातील अंगणवाडी मधील विध्यार्थ्यांना देण्यात आल्या जंतनाशकाच्या गोळ्या
सिटी बेल | मुरूड | अमूलकुमार जैन |
मुरूड तालुक्यातील अंगणवाडी मधील विध्यार्थ्यांना जंतनाशकाच्या गोळ्या देऊन जंतामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम व त्यामुळे शरीरात उत्पन्न होणाऱ्या विविध व्याधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत विध्यार्थ्यांना देण्यात आलेल्या एलबेंडोजॉल गोळ्याच्या प्रमानाबद्दल वयोगटानुसार माहिती सांगण्यात आली. असून वय १ ते २ वर्ष अर्धी गोळी,वय २ ते ३ वर्ष एक गोळी आणि वय ३ ते १९ वर्ष वयोगटासाठी एक गोळी चघळून खावी असे आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत अवाहन करण्यात आले.सध्यस्थीतीत ऍनिमिया सदृश्य रोगावर मात करण्यासाठी जंतनाशक गोळ्या सेवन कराव्यात असेही सांगण्यात आले.







Be First to Comment