सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
सतत सुरू असलेला बिनतारी संदेश यंत्रणेचा आवाज तर कधी थर्ड डिग्री देताना आरोपीचा ओरडण्याचा आवाज त्याची सवय असलेल्या पोलिस ठाण्यात मात्र टाळ मृदुंगाचा आवाज यामुळे भक्तिमय वातावरण झाले होते. ऑन ड्युटी 24 तास सेवा बजावणारे पोलीस विभागाला सण उत्सवात अधिकच जबाबदारी वाढते.
त्यातच दोन वर्षापासून कोरोना महामारीचे संकट यामुळे अधिक कठोरपणे राबविण्याची जबाबदारी पोलीस खात्यावर आली आहे. गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी सतत दहा दिवस डोळ्यात तेल घालून पहारा दिल्यानंतर खालापूर पोलीस निवांत झाले आहेत.
पोलीस ठाण्यात विराजमान बाप्पांच्या सेवेत कर्मचारी तल्लीन झालेले पहायला मिळत आहेत. पोलीस विभागात राहुन आपली भजन कीर्तनाची आवड जोपासणारे पोलीस हवालदार तुषार सुतार पोलीस उपनिरीक्षक बजरंग परदेशी बाप्पाच्या भजनात चांगलाच ठेका धरला होता. खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभूते यांनी दहा दिवस तालुक्यात पोलिसांना सहकार्य करत शांततेत गणेश उत्सव पार पाडल्या बद्दल आभार मानत सोमवारी पोलीस ठाण्यातील गणपतीच्या आरतीचा मान दक्षता समिती सदस्य महिलांना दिला. या महाआरतीला दक्षता समितीच्या संजना पिंगळे, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शिवानी जंगम, महिला पोलीस उपनिरीक्षक काळे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
Be First to Comment