सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
गणेशोत्सवातील सजावटीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न अनेक गणेश भक्तांकडून केला जातो. त्यासाठी सजावट साहित्यामध्ये अनेक वेगवेगळ्या घटकांचा वापर करून रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील कासप गावातील ग्रामपंचायत सदस्या प्रमिला पाटील व त्यांचे पती योगेश पाटील यांनी गणपतीसाठी रासायनिक रंगाऐवजी हळद, मुलतानी माती,गेरु तसेच भाज्यांपासून तयार केलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर करून मुर्तीची रंगसजावट केली आहे.तसेच टाकाऊ पासून टिकाऊचा संदेश देत पुठ्ठे,पेपर, ग्लास आदी टाकाऊ पदार्थांपासून आकर्षक अशी सजावट केली आहे.
निसर्गाचा होणारा अनन्वित कत्तलीला आळा बसावा कारण निसर्ग टिकला तर माणूस जगेल या भावनेतून हा उपक्रम ग्रामपंचायत सदस्या प्रमिला पाटील आणि त्यांचे पती योगेश पाटील या दोघांनी राबविला आहे.
तसेच श्रीगणेशासमोर अनंत चतुर्दशी पर्यंत नित्यनेमाने हरिपाठ,पारायण, काकडा, भजन आदी कार्यक्रम कोरोना नियम पाळून सुरू आहेत.कासप येथील दोघा पती-पत्नीने टाकाऊ पासून टिकाऊचा संदेश..या सजावटीची परिसरात चर्चा आहे.
Be First to Comment