Press "Enter" to skip to content

धुतुम ग्रामपंचायतच्या विकासकामांची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पथकाद्वारे पाहणी

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

धुतुम ग्रामपंचायतच्या विकासकामांची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पथकाद्वारे पाहणी ODF प्लस पुरस्कार प्राप्त धुतुम ग्रामपंचायतीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे प्रतिनिधी जुनेद उस्मानी सर व श्रीमती सुचिता देव मॅडम यांच्या सोबत श्री कचरे युनिसेफ प्रतिनिधी मुंबई तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता तज्ञ जयवंत गायकवाड , जिल्हा आय इ सी तज्ञ सुरेश पाटील , उरण पंचायत समिती BDO नीलम गाडे , श्री. अंजने, अनिल नारांगिकर,श्री पालव तसेच इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.

या सर्वांचे स्वागत धुतुम ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच रेश्मा शरद ठाकूर, उपसरपंच सविता ठाकूर, ग्रा. सदस्या आशा ठाकूर,वैशाली पाटील, सदस्य शरद ठाकुर, सदानंद ठाकूर, आणि ग्रामसेवक विनोद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कमिटीनी गावाच्या सांडपाणी व्यवस्थापनाची पाहणी केली बंदिस्त गटर व योग्य नियोजन तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी आणि माहीत घेतली. प्रकल्पाची माहीत मे.लास ग्रीन चे डायरेक्टर श्री साई खानोलकर यांनी दिली. वृक्षरोपण व संवर्धन तसेच नियोजनपूर्वक कामाबद्दल कमिटीनी समाधान व्यक्त केले आणि सरपंच, उपसरपंच सदस्य, सदस्या यांचे कौतुक केले. तर धुतूम गावाच्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय कमिटी दिल्ली वरून आल्याने सरपंच रेश्मा शरद ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.