Press "Enter" to skip to content

माथेरानच्या “बाल तरुण गणेश मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवास ३६ वर्ष पूर्ण “

सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |

अनेकदा अंतर्गत मतभेदांमुळे कुठलीही सार्वजनिक संघटना असो, मंडळे असोत अथवा गट असोत हे सहसा फार कालावधी पर्यंत तग धरत नाहीत परंतु आम्ही ३६ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या आणि विशेष म्हणजे त्यावेळेस मी आपल्या मित्र परिवाराचा सुध्दा सार्वजनिक गणेशोत्सव असावा जेणेकरून सर्वजण एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने सहभागी होऊ शकतात.यातूनच प्रत्येकाच्या आचार अन विचारांची देवाणघेवाण होऊ शकते या छोट्याशा मंडळामुळे मित्र परिवारा मधील संघटन अधिकाधिक मजबूत होऊन एकतेचा आणि सामजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो यासाठी आम्ही स्थापन केलेल्या संत रोहिदास नगर येथील बाल तरुण गणेश मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवास ३६ वर्ष पूर्ण झाली आहेत याचे खूपच समाधान वाटत असल्याचे मत माथेरानचे भूमिपुत्र रायगड भूषण शिक्षक नारायण भिकू सोनावणे यांनी व्यक्त केले आहे.

आज समाजाला व्यासपीठ उपलब्ध आहे.त्याकाळी तशी खूपच प्रतिकूल परिस्थिती होती.परंतु मंडळातील सर्वांनी वेळोवेळी सावरून नेले.
गणेश मंडळ जीवनमुल्य जोपासित माथेरानचे पर्यावरण समृध्द करण्याचा प्रयत्न नवीन मंडळातील सदस्यांसह सर्वजण श्रमदानातून करीत आहेत.समाजाचा सार्वजनिक गणपती असावा असा मनोदय प्रथम मी मारुती सोनवणे व सीताराम तांबे यांजकडे व्यक्त केला.तदनंतर त्यांनी माझ्यासह शंकर तांबे,राकेश काळे,दिलीप सोनवणे आणि मित्रांना चांभार पाणी येथे बोलावून घेतले.तशी सहचर्चा केली नी १९८४ साली पाहिलेले स्वप्न आम्ही सर्वांनी १९८५ मध्ये साकारले.

माथेरानमध्ये ग्रामदैवत “पिसरनाथ मंदिर”हे जगप्रसिद्ध आहेच. संस्कृतिक वारसा माथेरानला मोठा आहे.येथे विविध गणेश मंडळ गणेशोत्सवात मोठ्या आनंदात सक्रिय होतात.
माघी गणेशोत्सव आणि गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत सर्व आनंदात सण साजरा करतात.गणपती विसर्जनची मिरवणूक अत्यंत मनमोहक व शिस्तबध्द पाहण्यासारखी असते.हे एक माथेरानचे वैशिष्ट आहे.

निसर्गाचे भान ठेवून गणपती उत्सव साजरा करणाऱ्या अनेकात एक रोहिदास नगर मधील “बाल तरुण गणेश मंडळाचा गणपती” होय.
माथेरान मधील ३६ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बंगलेवाले व मोलमजुरी करणारे अशी फळी होतीच.सर्व सामान्य नित्य क्रम कंठीत असताना जीवन शैलीत कमालीचा फरक होताच.आमच्या समाजात तशी प्रतिकूल परिस्थिती होती.तरुणांना रोजगार नव्हता.आम्ही मुले तसे सरस्वती मंदिर या शाळेमध्ये शिक्षण घेत होतो.पण कुटूंबाला हातभार म्हणून जवळ जवळ सर्व मुले पारंपरिक व्यवसाय करीत होती.

थोड्या पैशाच्या मिळकतीत शिक्षणाकडे दुर्लक्ष होत होते.पूर्वी पासून भजन मंडळीने मोठ्या श्रध्देने भजन ,कीर्तन करून संत साहित्य परंपरा समाजात प्रवाहित ठेवली. ज्यांचे ऋण समाजावर आहेत.त्यामध्ये वंदनीय सीताराम तांबे,श्री बी.टी.पवार, रघुनाथ साळुंके, अनंत साळुंके, मारुती सोनवणे, आनंद सोनवणे, विठ्ठल काळे, शंकर कारंडे, हनुमंत साळुंके आणि अज्ञात सर्व यांचं मोलाचे योगदान लाभले होते.प्रारंभीच्या काळात श्री दिनकर काळे यांनी मंडळाला खूप मदत केली.आणि प्रेरित केले.समाजाच्या सहकार्यातून मानवतेचे,श्रद्धेचे हे मंदिर निर्मितीची संकल्पना साकारता आली याचे खूपच समाधान वाटते.या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी गणेशोत्सव काळात गावातील प्रतिष्ठित मंडळींना सन्मानित करण्यात येत असते ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे असेही नारायण सोनावणे यांनी सांगितले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.