Press "Enter" to skip to content

नवी मुंबईत गणेश मंडपात नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी

करोनाची भीती घालविण्यासाठी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम

सिटी बेल | नवी मुंबई |

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झालेला असला तरीही तिसऱ्या लाटेच्या भीतीच्या सावटाखाली गणेशोत्सव सुरु आहे. सुरक्षित अंतर व तोंडावर मास्क तसेच इतर करोनाचे नियम पाळून अनेक गणेशभक्त सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. या गणेश भक्तांच्या सुदृढ आरोग्यसाठी नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे मदतीचा हात पुढे केला असून  सार्वजनिक संस्कृती उत्सव मंडळ सेक्टर १८ नेरूळ इथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबीरात गणेश मंडपात  १३० गणेशभक्तांची मोफत तपासणी करण्यात आली.

या वैद्यकीय तपासणीमध्ये ईसीजी,ब्लड शुगर,रक्तदाब व तज्ञ डॉक्टरांतर्फे  मार्गदर्शन करण्यात आले तसेच या मंडळातर्फे गणेशभक्तांना मोफत चष्म्याचे वाटप केले गेले. सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये सर्दी-खोकला, उलटय़ा-जुलाब यांसारख्या तक्रारी वाढत असून अजूनही अनेक नागरिक करोनाच्या दहशतीखाली आहेत त्यामुळे अशा आरोग्य शिबिरांमुळे नागरिकांचे मनोबल वाढेल अशा विश्वास तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे व्यक्त करण्यात आला.

गणेशोत्सव, नवरात्र , दसरा दिवाळी असे अनेक सण येत्या काळात साजरे होणार असून करोनाची वाढ होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. करोनाची लाट संपेपर्यत शरीरातील साखर व रक्तदाब याची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.