संचालक आमदार शशिकांत शिंदे आणि शासकीय अधिकारी यांची भ्रष्टाचारात युती असल्याचा आरोप
शौचालयाच्या ठेकेदारावर आली आत्महत्त्या करण्याची पाळी
सिटी बेल | नवी मुंबई |
नवी मुंबई परिक्षेत्रात असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील 12 पैकी 10 शौचालय संकुल चालविण्याचे कंत्राट सुरेश मारू यांच्याशी संबंधित 3 सेवाभावी संस्था यांना 2017-2018 सालात देण्यात आले होते .सदरच्या कंत्राट साठी मोठ्या प्रमाणात रक्कम शासकीय अधिकारी व पणन संचालक श्री सोनी,बाळासाहेब पाटील,पणन मंत्री यांचे osd अविनाश देशपांडे, APMC मधील विविध खात्याचे शासकीय अधिकारी यांनी घेतली आहे. सदर कंत्राट हे उच्चतम दराची निविदा असल्याकारणाने मंजूर झाले होते.कंत्राट मंजुरी नंतर निविदा दर कमी करून देण्याच्या नावाखाली परत पैसे उकळले गेले.
जेव्हा मंत्रालयातून कमी दराच्या निविदेनुसर पूर्वलक्षी प्रभावाने वसुली करण्याचे आदेश शासकीय पत्राद्वारे देण्यात आले.या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मा आमदार श्री शशिकांत शिंदे यांनी 50 लाख रुपयांची रक्कम मागितली.ती देण्यास असमर्थ असल्यामुळे APMC सेक्रेटरी यांच्यावर दबाव टाकून त्यांच्या अधिकारात कंत्राट रद्द करणे नसताना सुद्धा त्यांनी कंत्राट रद्द करून ताबा घेतला. या कंत्राटदाराच्या अनामत रकमा जप्त करण्यात आल्या.जवळ जवळ 2017-2018 ते 2020 पर्यंत 2कोटी 19 लाख रुपयांची लूट शशिकांत शिंदे व APMC मधील शासकीय अधिकारी व पणन चे संचालक यांनी केली आहे.
कोरोना काळातील सर्व संकुले बंद असताना त्यांनी भाडे भरणे बंधनकारक नसताना या काळातील भाडे वसुलीसाठी कंत्राटदार यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता.याबाबत सर्व बैठका शशिकांत शिंदे यांचे भाचे शिवनाथ वाघ यांच्यासोबत होत होत्या. कंत्राटदार शशिकांत शिंदे यांना 2005 पासून पैसे देत आहे.
कंत्राटदार हे वेळोवेळी पैसे देत असल्या कारणामुळे त्यांचे भाडे थकून सुद्धा त्यांना व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समिती संस्थेच्या नियमांप्रमाणे 3 महिने भाडे थकले असता अशा कंत्राटदारावर रिकव्हरी ची कारवाई सुरू होते. दीड वर्ष भाडं थकलं असून देखील कंत्राटदार व्यवसाय करू शकत होता कारण अधिकाऱ्यांना वेळोवेळी पैसे पुरवत होते. या अधिकाऱ्यांनी नुसताच भ्रष्टाचार केलेला नसून संस्थेचे नुकसान केले आहे.
पैसे दिलेल्यांची नावे व रक्कम
१.आमदार शशिकांत शिंदे : ६० लाख
२. सतीश सोनी (पणन संचालक ) :
४७.५० लाख
३. अविनाश देशपांडे (OSD सहकार मंत्री) :- ३५ लाख
४ अनिल चव्हाण,माजी सचिव :- १० लाख
५. शिवाजी पहिनकर,माजी सचिव:- १० लाख
६. विजय शिंगाडे उप सचिव :- १४ लाख
बद्रा शेट्टी (APMC वकील) :- २ लाख
७. रमेश किश्ते :- १५ लाख
८. सुदर्शन भोजनकर :- १० लाख
९. राजाराम धोंडकर :- ६ लाख
१०. विलास बिरादार :- ५ लाख
११. गोपाल मिस्त्री :- १.५० लाख
१२. शंकर आंबटकर :- १ लाख
१३. रवी पाटील :- १ लाख
१४. शिवनाथ वाघ ( शशिकांत शिंदे भाचा) :- १ लाख
१५. विलास पवार :- ७५,०००












Be First to Comment