सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या,पायी हळू – हळू चाला मुखाने गजानन बोला,या जय घोषात पाच दिवसाच्या गणपती गौरी ला निरोप देण्यासाठी गणेश भक्त सज्य झाले होते.यामुळेच पाताळगंगा या ठिकाणचा परिसरात गणरायाच्या आवाजाने भक्तिमय झाले होते. विसर्जनाच्या ठिकाणी गणरायाची विसर्जनाची तयारी चालली असल्यामुळे फटक्याच्या आणि टाळ्यांच्या आवाजात गुळाला उधळून मोठ्या आनंदाने गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
गणपती बाप्पाच्या अगमनाच्या समवेत पावसाने हजेरी लावल्यामुळे गणेश भक्तांच्या अनंदावर विर्झन पडले होते.मात्र आज विसर्जनाच्या दिवशी वरुन राजा बाप्पाला निरोप देण्यासाठी जणू तो अभिषेक करीत असल्याचा भास निर्माण झाला होता.दिड दिवसांचा बाप्पा हे घरघुती असल्यामुळे पावसाच्या पाण्यांचा अंदाज घेत लवकर तयारी करण्यात आली होती.पायी हळूहळू चाला आणी मुखाने गजानन बोला या भक्तीमय वातावरणात गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
गणपती विसर्जनाच्या वेळी आई,वडील घरातील वडीलधारी माणसे या लहान मुलांची समजूत काढण्यांचा प्रयत्न करीत होते गणपती बाप्पा पुढल्या वर्षी लवकर येणार ? यामुळे सर्व वातावरण भक्तीमय झाले होते.बाप्पाला भक्तीभावाने निरोप देत असतांना लहानापासून थोरापर्यंतचे डोळे पाणावले होते.मात्र गणपतीला निरोप देताना पायी हळु हळू चाला मुखाने गजानन बोला, एक, दोन,तीन, चार गणपती चा जयजकार,गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला,गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या भावपूर्ण गजरात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
Be First to Comment