Press "Enter" to skip to content

सिद्धी तपास्वी अक्षत ओसवाल यांची शोभयात्रा काढून सांगता

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत शहरातील महावीर पेठेमध्ये राहणाऱ्या अक्षत राजेश ओसवाल या 19 वर्षांच्या युवकाने 43 दिवसांत 36 दिवस कडक उपवास करून सिद्धी तप व्रत केले होते. या तपाची सांगता शहरातून शोभायात्रा काढून सांगता करण्यात आली.

अक्षत ने 36 दिवस केवळ गरम पाणी घेऊन उपवास केले. त्याच्या सांगतेच्या वेळी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांची आवर्जून उपस्थिती होती. शहरातून शोभायात्रा काढली तेंव्हा फुटरमल ओसवाल, योगेश ओसवाल आदींसह अनेक जैन बांधव भगिनी उपस्थित होते. शोभायात्रा जैन मंदिरा जवळ आल्यानंतर सिद्धी तपस्वी अक्षतने मंदिरात जाऊन दर्शन घेतले. साध्वी दिव्य प्रभाश्रीजी यांनी प्रवचनातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.