Press "Enter" to skip to content

कोरोनाची जनजागृती करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांची उरण ते महड पदयात्रा

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

देशात कोरोनाची संकट गेली दोन वर्षांपासून सुरू आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना आपल्यामधून हिरावून नेले आहे. आता येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेमध्ये लहानांपासून थोरांपर्यंत याची झळ पोहचणार आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व कोविड रुग्णांची गेली दीड वर्षे दिवस रात्र सेवा करणारे संतोष पवार यांनी आज सकाळी ५ वाजल्यापासून कोविड सेंटर उरण येथून आपल्या पदयात्रेला सुरुवात केली आहे. महडच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर पदयात्रेचा शेवट होणार आहे.

देशात, राज्यात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे हे आपण पाहतो आहोत. ह्याच तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रायगड जिल्ह्यात होऊ नये म्हणून गेले दीड वर्ष घर दार सोडून अविरत कोविड पोजीटिव्ह

रुग्णांची सेवा करीत असणारे सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी सध्या सुरू असणाऱ्या गणपती उत्सवा निमित्त अनेक ठिकाणी होणारी गर्दी पाहून अस्वस्थ होऊन जनतेमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

जनजागृतीच्या उद्देशाने आणि तिसऱ्या लाटे पासून जनतेचा बचाव होण्याच्या हेतूने श्रीगणेशोत्सवाचे औचित्य साधून आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता उरण ते महड हे ५६ किलोमीटर अंतर पायी चालत जाणार आहेत. त्यावेळी संतोष पवार यांच्या हातात कोविड संदर्भात निर्बंध पाळू या, आपल्या कुटूंबाचे रक्षण करूया आणि करूया पृथ्वीचे रक्षण करू या पर्यावरण संरक्षण अशा प्रकारचे बॅनर घेऊन ते पायी पडयात्रा सुरू केली आहे.यामध्ये ज्यांना कोणाला सहभागी व्हायचे असेलतर ते होऊ शकतात.

उरणमध्ये कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ते आजतागायत सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार हे आपला घरदार सोडून कोविड हॉस्पिटलच घर बनविले आहे. ते अहोरात्र कोविड रुग्णांची सेवा करण्याकडे त्यांचा कल आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये उरणमधील अनेकांचे हसते खेळते कुटूंब उध्वस्त झाले आहेत. याचा अनुभव संतोष पवार यांना आहे. त्यामुळे आता आलेली तिसरी लाट ही लहान बाळा पासून मोठ्या पर्यंत त्याचा प्रादुर्भाव होणार आहे. तसेच सध्या गणेशोत्सव जोरात सुरू आहे. त्याठिकाणी होणारी गर्दी विचारात घेता तिसरी लाटेचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जनतेने खबरदारी घ्यावी यासाठीच जनजागृती करण्याच्या दृष्टीने संतोष पवार यांनी उरण ते महड अशी पदयात्रा सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.