Press "Enter" to skip to content

अलिबाग येथील मोरया बाल रुग्णालयात कोव्हिडं प्रतिबंधात्मक लसीकरण

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

अलिबाग मध्ये बालरोग तज्ञ डॉ. सागर खेदू यांच्या मोरया हॉस्पिटल मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ( सशुल्क ) कोविड प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. याचे उद्घाटन अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रालेखा पाटील यांच्या हस्ते आले.

या प्रसंगी डॉ. विनायक पाटील, डॉ. गवळी, डॉ. रूपाली खेदू, डॉ. राहुल म्हात्रे, चेंढरे उपसरपंच यतीन घरत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.अलिबाग शहरासहीत तालुक्यात मोरया हॉस्पिटल कोव्हिडं प्रतिबंधात्मक लसीकरण करणारे पहिले खासगी खासगी हॉस्पिटल आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.