सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत नगरपरिषद प्रभाग क्रमांक -8 मध्ये म्हाडा कॉलनी येथे दि.9 सप्टेंबर रोजी लसीकरण शिबीर संपन्न झाले या मध्ये 95 जणांनी लसीचा लाभ घेतला.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने आणि कर्जत नगरपरिषद पुढाकाराने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.स्थानिक नगरसेविका स्वामिनी देवेंद्र मांजरे यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.कोव्हीशिल्ड पहिला आणि दुसरा डोस म्हाडा कॉलनीतील व कर्जत शहरातील नागरिकांना डोस घेतला.

याप्रसंगी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक बळवंत घुमरे, वैभव सुरावकर, मंदार मेहेंदळे,जगन्नाथ चव्हाण, ओमकार पांडे, संतोष पटेल, रविंद्र माने, युसूफ खान,सरस्वती चौधरी, मिलिंद खंडागळे, प्रशांत उगले,आशा जगताप, सविता ढाकणे, गणेश गवई, भाऊ डोळस, प्रशांत जगताप, मनोज रावळ, सूरज रावळ आदी सह म्हाडा रहिवासी उपस्थित होते.








Be First to Comment