Press "Enter" to skip to content

थोर समाजसुधारक अण्णा शिरगावकर यांचा ९२ वा वाढदिवस साजरा

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

थोर समाजसुधारक इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले अण्णा शिरगावकर यांचा ९२ वा वाढदिवस खारघरमध्ये साधेपणाने संपन करण्यात आला.

कोकणच्या इतिहासात ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक, अचूक टायमिंग साधणाऱ्या सहजस्फुर्त नर्मविनोदी शैलीतील लेखन संवादासाठी प्रसिद्ध असलेले अण्णा शिरगावकर यांना ९२ वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल त्यांचा ९२ वा वाढदिवस खारघर येथे संगीतमय वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी सामाजिक, शैक्षणिक कार्यातील त्यांचे सहकारी, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील, नाद ब्रम्हचे विनोद सावंत, विद्या, सीमा, समता, कादंबरी, भरत, मुलगी विभावरी, जावई संजय कामेरकर आदींच्या उपस्थित साजरा करण्यात आला.
शिक्षण हेच समाज सुधारण्याचे साधन आहे. एक कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांनी शिक्षणाची दारे खुली केली तर दुसरे अण्णा शिरगावकर हेच कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनी व्यक्त केल्या. तसेच त्यांच्या कार्याचा उपयोग देशाचे नागरिक घडविण्यासाठी त्यांचे शिष्य पुढे नेतील असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

अण्णा शिरगावकर यांचा ९२ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर त्यांचे मन भरून आले होते. या कार्यक्रमाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.