लसीकरण बाबतीत हलगर्जीपणा नको, आदिवासी वाड्या मध्ये लसीकरण मोहीम राबवा : आमदार महेंद्र थोरवे
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत तालुक्यातील कोव्हीड विषयक परिस्थिती संदर्भात आढावा घेण्यासाठी तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या.
आज दि.9 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता तहसील कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस प्रांत अधिकारी अजित नैराळे, तहसिलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी. के. मोरे, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, नगरसेवक संकेत भासे उपस्थित होते.
आमदार महेंद्र थोरवे हे नेहमीच विकासात्मक व धोरणात्मक कामे करण्यात लोकप्रतिनिधी म्हणून अग्रेसर आहेत. विकासात्मक दृष्टिकोना सोबत कर्जतमधील सर्व जनतेची काळजी घेणे त्यांना आरोग्य विषयक सोयीसुविधा पुरविणे हे आपले कर्तव्य आहे समजून कोव्हीड ची सद्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी व पुढील येणाऱ्या कोविडच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात काय उपाययोजना करता येतील या संदर्भात महिती घेतली. यात जास्तीत जास्त हा लसीकरणावर भर द्यावा असे सांगितले. आजही कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्या पाड्यांमध्ये अनेक आदिवासी बांधव लसीकरणापासून वंचित आहेत त्यामुळे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून लवकरच त्यांना लसीकरणास प्रवृत्त करावे असे सांगितले.
या बैठकीत सर्वच शासकीय अधिकारी यांनी कोव्हीड परिस्थितीत केलेल्या कामाचे विशेष कौतुक केले व येणाऱ्या तिसऱ्या लाटे संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार महेंद्र थोरवे यांनी दिल्या.








Be First to Comment