Press "Enter" to skip to content

आ.महेश बालदी यांच्या हस्ते “मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान” च्या आरती पुस्तकाचे प्रकाशन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

“मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान,उरण” च्या श्री गणेश आरती पुस्तकाचे प्रकाशन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी “मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान,उरण” चे अध्यक्ष विशाल विजय पाटेकर, भाजपा तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर तसेच “मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान,उरण”चे पदाधिकारी उपस्थित होते.

“मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान,उरण” या संघटनेला 5 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त तसेच हिंदू सणाबद्दल समाजाच्या प्रत्येक तरुणांमध्ये आणि घराघरांमध्ये संस्कृती जपून ती पुढे कशी वाढवता येईल या अनुषंगाने सर्वांना सामाजिक रित्या एकत्रित जोडणारा हिंदूंचा महत्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव. यानिमित्ताने आरती पुस्तक चे उद्घाटन विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. हे आरती संग्रह मी उरणकर सामाजिक संस्थेचे सभासद, कार्यकर्ते घरपोच वाटप करणार आहेत.संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून संस्थेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगत संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी आमदार महेश बालदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.