Press "Enter" to skip to content

गणपती प्रतिष्ठापणांसाठी भटजींना फुल्ल डिमांड : गेल्या आठवड्यापासून बाप्पांच्या प्रतिष्ठापनेचे निमंत्रण सुरु

ऑनलाइनच्या जमान्यात ही भटजींच्या दिवसभराच्या अपॉइंटमेंट होतायंत बुक

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळ्गंगा |

लाडक्या गणरायाचे यथोचित स्वागत आणि आध्यात्मिक शास्त्रानुसार प्रतिष्ठापनेसाठी गुरूजींना ( भटजींना ) निमंत्रीत करण्यांची संख्या या वर्षीही वाढली आहे.ऑनलाइन पूजेच्या अनेक वेबसाइट आहेत एवढेच नव्हे तर मोबाइलवर ॲप्लिकेशन उपलब्ध असतानाही, भक्त गुरूजींकडून गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून घेत असल्यामुळे दिवसभराच्या अपॉइंटमेंट ‘फुल’ झाल्या आहेत.असे मत नडोदे येथिल जंगम यांनी सिटी बेल च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

गणपती वर्षातून एकदाच येतो, त्याची आराधना मनापासून झाली पाहिजे, अशी गणेशभक्तांची मनोकामना असते.आज विज्ञान युगात मोबाईल मध्ये विविध ॲप्लिकेशन अथवा ऑनलाइन पूजेच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण होत नाही.यामुळे गुरूजी घरी आल्यास पूजा झाल्याचे समाधान मिळते.या बदलामुळे घरगुती गणपतींबरोबरच गणेश मंडळांची मागणी पुरवतानाही गुरुजींना मोठी कसरत होत असते.गेल्या आठवड्यापासूनच गुरूजींना प्रतिष्ठापनेच्या बुकिंगसाठी फोन सुरू झाले आहेत.

काही वर्षांपूर्वीपर्यंत एकत्र कुटुंबपद्धती असल्याने सगळ्या भावंडांत मिळून एकाच घरी गणपती बसत असे. अलीकडे प्रत्येक भाऊ वेगवेगळा राहत असले तरी सुद्धा या गणपतीच्या सणांच्या निमित्ताने एकत्रितपणे ऐवून घरात गणेशोत्सव साजरा होतो आहे. पर्यायाने प्रतिष्ठानेसाठी गुरुजींची मागणी वाढली आहे. याच वेळी पौरोहित्य करणारी नवीन पिढी कमी होत असल्याने मागणीच्या तुलनेत गुरुजींची संख्या कमी झाली आहे.

पूजा करताना काही गडबड होऊ नये, म्हणून गुरुजींचा पर्याय अनेकांना सोयीस्कर वाटतो.गणपतीबद्दल नागरिकांना विशेष श्रद्धा आहे, गणरायाच्या पूजेमध्ये कोठेही तडजोड करण्याची त्यांची इच्छा नसते. गुरुजींनी पूजा केल्यास घरामध्येही भक्तिमय, मांगल्याचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे गणेश भक्त गुरुजींना प्राधान्य देतात. यामूळे गेल्या दोन ते तीन वर्षांत गुरुजींना बोलावणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.