Press "Enter" to skip to content

रोहे येथे बँक ऑफ इंडिया संचालित मनीवाइज वित्तिय साक्षरता सेंटरचे उद्घाटन

सिटी बेल | रोहा | नंदकुमार मरवडे केशव म्हस्के |

आजच्या विज्ञान युगातील संगणकीय प्रणाली झपाट्याने विकसित होत असल्याने अद्यावत तंत्रज्ञानाचे फायदे जाणून घेत रोहा येथे बँक ऑफ इंडिया संचालित, रिज़र्व  बँक ऑफ इंडिया च्या व CRISIL सोबत कॉलेबोरेशन असलेल्या रोहा तालुक्याच्या  MONEYWISE -center for financial literacy (मनीवाइज – वित्तिय साक्षरता  सेंटर) चे शानदार उद्घाटन करण्यात आले.        

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोहा नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका सौ.स्नेहा अंबरे  यांच्या शुभ  हस्ते करण्यात आले त्यांच्या समवेत एक्सेल इन्डस्ट्रीज सी.एस.आर.हेड श्री रूलेकर सर,धाटाव ग्रामपंचायत सदस्या सौ.उत्तरा उत्तम म्हस्कर,खेड सेंटर मॅनेजर सौ.रोहिणी अवघडे,दापोली सेंटर मॅनेजर सौ.निशा उपलप, स्वामीराज फाउंडेशन चे अध्यक्ष श्री जयेश माने, विमा सल्लागार सौ.ज्योति पाशीलकर व श्री दीपक पाशीलकर आदी प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
     

सदरील  कार्यक्रमाचे नियोजन रोहा सेंटर मॅनेजर सौ.सुप्रिया पाशीलकर व फील्ड कोऑर्डिनेटर सौ.संजीवनी जयेश माने यानी केले.बँक ऑफ इंडिया च्या या प्रोजेक्ट मुळे ग्रामीण विभागातील गावगावत आर्थिक साक्षरता  पोहचविण्यासाठी ची मोठी मदत होईल.तसेच डिजिटल ट्रांसेक्शन, आर्थिक बचत, विमा संरक्षणआदी शासनाच्या वेगवेगळ्या योजनाच लाभ  समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांना देण्याचे काम या प्रोजेक्ट मुळे होणार आहे असे रोहा सेंटर व्यवस्थापक सौ.सुप्रिया पाशीलकर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.