Press "Enter" to skip to content

खांब येथे संत सेनामहाराज पुण्यतिथी भक्तीमय वातावरणात संपन्न

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील खांब येथे नाभिक समाजाचे वतीने परंपरेने चालत आलेल्या संतश्रेष्ठ सेनामहाराज यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या धार्मिक तथा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

श्रावण कृष्ण द्वादशी या शुभ पर्वावर संत सेना महाराजांच्या संपन्न झालेल्या पुण्यतिथी सोहळ्यात विविध प्रकारचे धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात आले.रोहा तालुका उपाध्यक्ष दिलीप मोहिते , खांब विभागीय अध्यक्ष राहुल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली व रवींद्र मोहिते यांच्या खांब येथील निवासस्थानी संपन्न झालेल्या या सोहळ्यास ह.भ.प .बापू महाराज राहणार पेण यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्यांनी सेना महाराजांचे चरित्र प्रकट केले तसेच सर्व समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी श्री दिलीप मोहिते व राहुल मोहिते यांनी सर्व समाज बांधवांना संघटित राहण्याचे व सामाजिक विकास साधण्याचे आवाहन केले . या पुण्यतिथी निमित्त सर्व समाज बांधव व महिला वर्ग आवर्जून उपस्थित होते. तर या सोहळ्यास विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी भेट देऊन या सोसळ्याची शोभा वाढविली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.