सिटी बेल | उरण | सुभाष कडू |
आकाश फाउंडेशन मुबंई आणी दिप मंदिर सोसायटी चेंबूर यांच्या तर्फे पुनाडे आदिवासी वाडीवरिल आदिवासी बांधवांना गणपतीची बाप्पा च्या आगमना पूर्वीच नवीन – जुने कपडे महिलांना नवीन – जुन्या साड्या तसेच काहींना चप्पल बूट तर लहान मुलांना खाऊ आणि खेळणी भेट देण्यात आली.सदर कार्यक्रमाचे आयोजन सारडे विकास मंच या सामाजिक संस्थेने केले होते.

यासाठी कार्यक्रमासाठी आकाश फाऊंडेशन मुबंई च्या संजिवनी शृंगारे , विनोद श्रुंगारे , रेशमा केणी तसेंच दिप मंदिर सोसायटीचे सर्व राहिवाशी यांनी मोलाचं सहकार्य केले.या कार्यक्रमासाठी उरण मधील अनेकांनी मदतीचा हात पूढे केला होता.त्यामूळे पुनाडे आदिवासी वाडीवर गणपती बाप्पा च्या आगमना आधीच कपडे मिळाल्याने आदिवासी महिला,पुरुष,व बालकांच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून जात होता.

या प्रसंगी,सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे संस्थापक राकेश पाटील , सुयश क्लासेसचे अद्यक्ष निवास गावंड ,वशेणी गावचे माजी सरपंच प्रसाद पाटील, प्रणव ठाकूर कोप्रोली, सारडे विकास मंच चे कार्याध्यक्ष रोहित पाटील,अल्पेश जोशी, त्रिजन पाटील,प्रितेश म्हात्रें, स्नेहा पाटील,रुपाली म्हात्रें,रिया म्हात्रें आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते.









Be First to Comment