Press "Enter" to skip to content

मोहोपाड्यात राष्ट्रसंत संतशिरोमणी महाराजांची पुण्यतिथी साजरी

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

नाभिक समाजाचे आराध्यदैवत वारकरी संप्रदायाचे महान संतश्रेष्ठ राष्ट्रसंत संतशिरोमणी श्री संतसेवा महाराज यांची 667 वी पुण्यतिथी रसायनी पाताळगंगा विभागातील नाभिक समाज बांधवांनी ‌मोहोपाडा बाजारपेठेतील जयकुमार नारायण गायकवाड यांच्या यांच्या दुकानात आज शनिवार दि.4 रोजी दुपारी साजरी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रसंत संतशिरोमणी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून परिसर सुगंधीत करण्यात आला.यावेळी जयकुमार गायकवाड यांनी राष्ट्रसंत संतशिरोमणी महाराजांचा महिमा नाभिक समाजाला सांगितला.

यानंतर नाभिक समाज बांधवांनी महाराजांना अभिवादन केले.यावेळी परिसरातील नाभिक समाज बांधव अध्यक्ष पांडुरंग शांताराम गायकवाड, सदस्य मधुकर गायकवाड, संदिप साळुंखे,विलास क्षिरसागर, रमेश क्षिरसागर,हेमंत गायकवाड, गुरुनाथ धारेकर, प्रल्हाद श्रीजे,आशिष गायकवाड,मंदार गायकवाड, हरिश्चंद्र मंडळीक,मनिष गायकवाड,प्रविण माळी,वसंत गायकवाड, कृष्णा साळुंखे, अशोक जाधव, नितिन पंडित, काशिनाथ क्षिरसागर,विकी बोरकर, अक्षय वाघमारे, रविंद्र गायकवाड,रितेश विकार, सिताराम गायकवाड,मधुकर हरि गायकवाड,वनेश गायकवाड आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.