Press "Enter" to skip to content

उरण नगरपालीका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन : ठाण्याच्या सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे हे आपले कर्तव्य बजावीत असताना गुन्हेगार प्रवृत्तीचे फेरीवाले अमरजित यादव यांनी जीवघेणा हल्ला केला. त्याच्या निषेधार्थ उरण म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनने आज एक दिवस काम बंद आंदोलन केले होते.

ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे हे सोमवार दि. ३० ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजता अतिक्रमण विभाग पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करीत होते. त्यावेळी गुन्हेगार प्रवृत्तीचे फेरीवाले अमरजित यादव यांनी सबधितांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पिंपळे मॅडम यांच्या हाताची तीन बोटे कापली गेली तर अंगरक्षक पालवे यांचे एक बोट कापले गेले.

हा भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी याचा निषेध करून संघटनेच्यावतीने एक दिवस काम बंद आंदोलन उरण म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनने करून गुन्हेगारांना कडक शासन करण्याची मागणी केली. अध्यक्ष रमेश कांबळे, कार्याध्यक्ष संतोष पवार, मधुकर भोईर, सचिव नरेंद्र उभारे आदींच्या सह्यांचे असलेले निवेदन नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, उरण पोलीस ठाणे व तहसील कार्यालय यांना देण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.