सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब ता.रोहे या शिक्षण संस्थेचे श्री. रा.ग.पोटफोडे(मास्तर) विद्यालय व द.ग.तटकरे ज्युनि. काँलेज खांब येथील सहा. शिक्षिका अनुराधा अविनाश म्हात्रे आपल्या शिक्षकी सेवेतून सन्मानाने सेवानिवृत्त झाल्या आहेत.
सहा. शिक्षिका अनुराधा म्हात्रे यांनी आपल्या सेवाकाळात संस्थेच्या श्री. रा.ग.पोटफोडे(मास्तर) विद्यालय खांब व श्रमिक विद्यालय चिल्हे येथे सुमारे ३० वर्षे आपली सेवा अतिशय प्रामाणिकपणे व निष्ठेने पुर्ण केली. अतिशय शिस्तप्रिय व सर्वांशी मिळून मिसळून वागणा-या अनुराधा म्हात्रे यांच्याकडे वाचन,सुंदर हस्ताक्षर,गायन, उत्तम वत्क्रुत्व,संभाषण कौशल्ये,विविध विषयांचा सखोल अभ्यास, नेतृत्व आदी गुणकौशल्ये हे त्यांचे वैशिष्ट्ये होते.व या गुण कौशल्यामुळेच त्या सर्व विद्यार्थी व शिक्षकवर्गात प्रिय होत्या.

तर शिक्षिकी सेवेतील त्यांच्या या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना आतापर्यंत विविध पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत.तर रा.जि.परिषदेतर्फे दिला जाणारा २०२० सालचा आदर्श शिक्षक पुरस्कारही जाहिर झाला आहे. त्या सर्व विद्यार्थी व शिक्षकवर्गात प्रिय होत्या.
त्यांच्या सेवानिवृत्तप्रित्यर्थ संस्था व विद्यालयाचे वतीने ता.१ सप्टें.रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शानदार सन्मान करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.यावेळी चेअरमन महेंद्र पोटफोडे, सचिव धोंडू कचरे,संचालक रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे,धनाजी लोखंडे, मुख्याध्यापक सुरेश जंगम व संस्थेच्या तिन्हही विद्यालयातील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व म्हात्रे परिवारातील त्यांचे आप्तसी उपस्थित होते.








Be First to Comment