सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)
उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसते. आज पॉझिटीव्हचा आकडा ही मोठा आहे. परंतु त्यापेक्षा बरे होऊन घरी सोडलेल्यांचा आकडाही त्यापेक्षा जास्त आहे ही एक जमेची बाजू मानली जात आहे. आजच्या रिपोर्टमध्ये ३० जण पॉझिटीव्ह सापडले तर ४५ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
सावरखार १, जसखार १, जासई १, उरण कामठा २, उरण १, मोरा रोड १, नागाव आंबिकावाडी २, वशेणी २, सोनारी ३, डोंगरी ३, बोकडविरा २, बोरी साई नगर ३, साई अपार्टमेंट आंदनगर १, जेएनपीटी १, म्हातवली २, फुंडे १, उरण वाणी आळी १, करंजा सातघर १, मुळेखंड तेलीपाडा १ असे एकूण ३० जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर घारापुरी १, एनएडी १, मुळेखंड १, द्रोणागिरी १, जेएनपीटी २, बोकडविरा २, आवरे १, जासई ३, नविनशेवा १, सावरखार ३, म्हातवली १, नागाव २, कोटनाका २, ओएनजीसी सीआयएसएफ ३, धाकटी जुई १, पाणजे ३, वशेणी १, जसखार २, सोनारी ३, उरण ११ असे एकूण ४५ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत.
एकूण पॉझिटीव्ह ७८७, बरे झालेले ६०७, उपचार घेणारे १५८ तर मयत २२ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आजच्या रिपोर्टमध्ये पॉझिटीव्हचा आकडाही मोठा म्हणजे ३० आला आहे. तर उपचार करून घरी सोडलेल्यांचा आकडा हा त्यापेक्षा मोठा म्हणजे ४५ आला ही एक जमेची बाजू मानली जात आहे. मात्र उरणमध्ये कोरोना सर्व ठिकाणी हातपाय पसरू लागल्याने आता तरी उरणच्या जनतेने सावध रहात योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे.
Be First to Comment