Press "Enter" to skip to content

वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागात ऑगस्ट अखेर 11 कोरोनारुग्ण

तिसरी लाट रोखण्यासाठी नागरीकांनी नियमांचे पालन करण्याची गरज

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. कोरोना संसर्गं कधी, कुठे, कसं, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगू न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याने चित्र असून सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.नवे रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात कोरोनामुक्त होणा-या रुग्णांचा आकडा कमी असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

रसायनी परीसरातील वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने पहिल्या लाटेपासूनच आपली दहशत निर्माण केली.तशीच दुसऱ्या लाटेतही दिसून आली.मोहोपाडा कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख सध्या खालावला असला तरी रसायनीकरांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

सध्या वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागात 31 ऑगस्टपर्यंत दहा दिवसांच्या कालावधीत एकूण 11 रुग्ण सक्रिय असून परिसरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1805 झाली आहे.यात कोरोनावर 1729 जणांनी मात केली आहे.तर वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील एकूण 65 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

परिसरात मृत्यूदर जरी कमी असला तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन शासनाच्यावतीने होत आहे.

वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील कोरोनाग्रस्तांची 31 ऑगस्टपर्यंत असलेली गावनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे

मोहोपाडा — कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या-02
रिस परिसर – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या – 04
नविन पोसरी – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या-00
चांभार्लीं – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या -00
शिवनगर – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या – 00
आली आंबिवली – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या – 01
लोधिवली परिसर – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या – 04
पानशिल – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या – 0
तळेगाव – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या – 0
रिसवाडी – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 0
तळेगाव वाडी – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 0
पराडे – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 0
खाने आंबिवली – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 00
भटवाडी/कालणवाडी – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 00
कांबे – 00

दरम्यान खालापूर तालुका क्यातील 9448 रुग्ण संख्या आहे.तालुक्यात आजपर्यंत 9160 जण कोरोनामुक्त झाले असून 178 मयत झाले आहेत.तर 31 ऑगस्टपर्यंत चौक मंडलात एकूण 2725 रुग्ण संख्या असून एकूण 92 जण मयत झाले आहेत.कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

शासनाने १८ वर्षांवरील सर्वांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीकरण सुरु केले असून सर्वांनी लसीकरण करून घ्यावे.कोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी ऐन गणेशोत्सवात नियमांचे पालन करावे,विनाकारण बाहेर न फिरता वेळोवेळी हातपाय स्वच्छ धुवावेत,सोशल डिस्टिंक्शन पालावे,मास्कचा वापर करावा असे आवाहन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.