Press "Enter" to skip to content

कामगार नेते लिलाधर भोईर यांना मुख्य यांत्रिक इंजिनिअर हा मानाचा अ‍ॅवॉर्ड

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |  

खांदा वसाहत परिसरात राहणारे शिवसेना पदाधिकारी व कामगार नेते लिलाधर भोईर यांना पश्‍चीम रेल्वेच्या 66 व्या रेल्वे सप्ताहात  रोलीग स्टाँक विभागात 2020- 2021 मध्ये सर्वोत्तम कार्य करणार्‍या रेल्वे कर्मचार्‍याना आज प्रमुख मुख्य याञिक इंजिनियर  हा मानाचा अँवार्ड देऊन गौरविण्यात आले.

पश्‍चिम रेल्वेच्या महालक्ष्मी वर्कशाँप मध्ये कार्यरत असणारे लिलाधर भोईर (टेक्निशियन ग्रेड) याच्या विषेश कामावर प्रभावित होऊन,तसेच कोरोना काळात रेल्वे कर्मचार्‍यांसाठी दिलेल्या योगदानासाठी लिलाधर भोईर याना सिल्व्हर मेडल आणी प्रशस्तीपत्र देऊन त्याना गौरविण्यात आले.

हा सोहळा पश्‍चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट येथे अशेष अग्रवाल यांच्या हस्ते पार पडला. लिलाधर भोईर यांच्यावर सर्व कामगारातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. लिलाधर भोईर हे कामगार नेते सुध्दा आहेत . नुकत्याच गुजरात (बडोदा) येथे पार पडलेल्या पश्‍चिम रेल्वे ऑल इंडिया ओ बी सी असोशिएशन च्या अधिवेशनात त्याची झोनल एक्झीक्युटिव मेम्बर, आँफीस सेक्रेटरी म्हणुन बिनविरोध निवड झाली आहे.

ते महालक्ष्मी वर्कशाँप ब्रँचचे अध्यक्ष आहेत. त्यांनी हा पुरस्कार ज्याच्या मार्गदर्शनाने  ते भारतीय रेल्वेत कामाला लागले असे  देविदास गोविंद पाटिल (दादा)याच्या चरणी अर्पण करीत असल्याचे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.