Press "Enter" to skip to content

19 व्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत पालीतील विद्यार्थ्यांची बाजी 

राजश्री लर्निंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी पटकावली भरघोस बक्षिसे

सिटी बेल | बेणसे – रायगड | धम्मशील सावंत |

सोलापूर येथील सीमा अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या 19 व्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत पालीतील राजश्री लर्निंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांनी रोख रकमेसह पारितोषिक अशी भरघोस बक्षिसे मिळविली आहेत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम नुकताच पालीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

   

या स्पर्धेत यानी भूषण राठोड व काव्या गुप्ता या चॅम्पियन ठरल्या आहेत. तर पुनीत विनय ओसवाल, आर्यन हेमंत सोनावणे, सिद्धी योगेश राठोड, यश महेश गवारी व समृद्धी कारखेले यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. आणि श्राव्या शेठ हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर नीती सचिन खिंवसरा, नित्या तुषार म्हसळेकर, पुरब वरुण शहा, नेहल पराग मेहता, निधी प्रशांत शेठ, आश्वि अंकीत ओसवाल या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.   

सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायण्णावार, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, बँक ऑफ इंडिया पाली शाखेचे व्यवस्थापक राजेंद्रप्रसाद गुप्ता व राजश्री लर्निंग सेंटरच्या संचालिका राजश्री बोलके यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मान्यवर, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

   

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी असलेले या स्पर्धेसाठी राजश्री लर्निंग सेंटरच्या संचालिका राजश्री बोलके यांनी मुलांचे ऑनलाइन प्रशिक्षण घेतले. त्यामुळे हे विद्यार्थी घवघवीत यश संपादन करू शकले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्थरातून कौतुक केले. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.