Press "Enter" to skip to content

नातवंडांतर्फे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मध्ये वृक्षारोपण

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

प्रकृतीचे रक्षण हे भविष्यासाठी सुखाची नांदी होय जो निसर्गाचे करील रक्षण निसर्ग तयास देईल भरभरून सुखसोई
स्वर्गीय राधाबाई परशुराम म्हात्रे रा. चिरनेर यांच्या स्मृती प्रित्यर्थ साधना माधुरी, मिनल , गुडडी, योगेश केशव माळी, किलबिल या नातवंडांतर्फे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मध्ये रविवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करण्यात आले.

पूर्वजांनी ठेवलेला वारसा जतन करण्यासाठी आपल्या आजीच्या नावानं वृक्षारोपण खरच प्रेरणादायी उपक्रम आहे. आपल्या आजीच्या आठवनी जाग्या रहाव्यात यासाठी निसर्ग संवर्धन काळाची गरज लक्षात घेत सारडे विकास मंच मार्फत आपल्या आजीच्या स्मृती प्रित्यर्थ आज पर्यटन दृष्ट्या कमालीचे चर्चेत असलेल्या कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे येथे या नातवंडांनी संकल्प करू तो पूर्ण देखील केला आहे.

जेव्हा जेव्हा या ऑक्सिजन पार्क आपण भेट देऊ तेव्हा ही झाड आपल्या आजीची आठवण करून देतील. जणू काही आजीचं स्मरण सतत होईल असा विश्वास मनाशी बाळगत नातवंडांनी हा अनोखा संकल्प केला. या वृक्षारोपणासाठी स्वर्गीय राधाबाई परशुराम म्हात्रे रा. चिरनेर यांची नातवंड साधना माधुरी, मिनल ,गुडडी, योगेश केशव माळी तसेच सुयश क्लासेसचे अध्यक्ष निवास गावंड सर सारडे विकास मंचा चे उपाध्यक्ष संपेश पाटील, खजिनदार रोशन पाटील, कार्याध्यक्ष रोहित पाटील प्रितेश म्हात्रें ,त्रिजन पाटील हजर राहून सहकार्य केले. सर्वाचे सारडे विकास मंचतर्फे आभार मानण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.