Press "Enter" to skip to content

कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे येथे साईकृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेंटर कोप्रोलीतर्फे वृक्षारोपण

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

संगणक शिक्षण ही काळाची गरज अशी व्याख्या आज केली जात आहे जर संगणक शिक्षण नसेल तर माणूस साक्षर असून निरक्षर समजला जातो परंतु संगणक शिक्षण म्हणजे तांत्रिक शिक्षण देणारे निसर्गाच्या विषयी प्रचंड ओढ असणारी संस्था साईकृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेंटर,कोप्रोली होय आणि संपूर्ण विश्व हे हरीत मय व्हावं अस स्वप्न उराशी बाळगत आजच्या कॉम्पुटर युगात विद्यार्थ्यांना कॉम्पुटरचे प्रशिक्षण देणाऱ्या MS-CIT कोप्रोली सेन्टर चे संस्थापक /प्रशिक्षक राकेश पाटील यांच्या प्रशिक्षण सेवेबरोबरच गेली अनेक वर्षे सतत नवनवीन सामाजिक उपक्रम राबविले जातात.

यावेळीही त्याचाच एक भाग म्हणून आज रविवार दि. २९ ऑगस्ट रोजी सारडे येथील कोमनादेवी ऑक्सिजन पार्क परिसरात निसर्ग समतोल राखणे आणि सामाजिक वनीकरण म्हणून वृक्षारोपण करण्यात आले. माणुस आज आधुनिक युगाकडे वाटचाल करीत असला तरी निसर्ग हाच खरा देव आहे आणि म्हणूनच या साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कोप्रोलीतर्फे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे उरणमध्ये आपल्या विद्यार्थी समवेत आदरणीय राकेश पाटील सर यांनी आपल्या निसर्गाच्या प्रेमा पोटी वृक्षारोपण केले.

सदर कार्यक्रमास राकेश पाटील सर यांच्याबरोबर विद्यार्थी वर्ग तसेंच सुयश क्लासेस आवरेचे अध्यक्ष निवास गावड सर, सारडे विकास मंचचे उपाध्यक्ष संपेश पाटील, खजिनदार रोशन पाटील, कार्याध्यक्ष रोहित पाटील, त्रिजन पाटील, प्रितेश पाटील आदींची उपस्थिती लाभली होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.