Press "Enter" to skip to content

आपटा आरोग्य केद्राची रुग्णवाहिका मोडकळीस, आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

गर्भवती महिला, आदिवासी रूग्णांच्या जीवाशी होतोय खेळ

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

कोरोना प्रादुर्भाव काळात आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका मोडकळीस व नादुरुस्त असल्या कारणास्तव परिसरातील गर्भवती स्त्रियांना तसेच येथील आदिवासी रुग्णांना व इतर समाजातील रुग्णांना अनेक वेळा खाजगी वाहन व इतर भाडेतत्वावर वाहनाचा वापर करावा लागतो. केलवणे जि.प. गटात 33 आदिवासी वाड्या व 20 ते 22 गावांचा समावेश होतो .

पंचायत समिती व केलवणे पंचायत समितीचा त्यामध्ये समाविष्ट आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी अभाव असल्याने गरोदर स्त्री तसेच प्रथमोपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना रात्री अपरात्री त्रास सहन करावा लागत आहे. सर्पदंश  झालेल्या रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. रुग्णवाहिकेचा चालक वारंवार गैरहजर असल्याने रुग्णांची गैरसोय होते.

आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका क्रमांक(MH06K9866) ही रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने दरवेळी 108 क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका बोलावली जाते, त्यासाठी खूप वेळ वाया जात असल्याने रुग्णांच्या जिवीतास धोका निर्माण होतो. ह्या कारणास्तव जिल्हा वैद्यकीय अधिकारी रायगड यांच्याशी व्यवहार करून नवीन रुग्णवाहिकेची मागणी केली आहे.

परंतु त्यांनी या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले व मुदत संपलेली रुग्णवाहिकाही सातत्याने चालू ठेवत त्याच खराब झालेल्या रुग्णवाहिकेत गरोदर स्त्रियांना रुग्णांस सेवा पुरविण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र आपटा येथील रुग्णवाहिकेची मुदत कालावधी संपून गेली आहे. मोटार व्हीकल अॅक्ट 1988 अधिनियमनुसार तातडीने रुग्णवाहिकेची तपासणी करून कायदेशीर कारवाई तालुका आरोग्य अधिकारी (THO) व जिल्हा आरोग्य अधिकारी(DHO) यांच्या कडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही दखल घेत नसल्याने नाईलाजाने तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी युवासेना अधिकारी स्वप्निल भुवड याने रसायनी पोलिस ठाण्यात दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.