वाचा या ऐतिहासिक गोष्टींचा संपूर्ण घटनाक्रम
सिटी बेल | बेणसे | रायगड | धम्मशील सावंत |
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आक्षेपार्ह वक्तव्ये त्यांना अटक व न्यायालयापर्यंत घेऊन गेले. दिवसभर ही प्रक्रिया सुरू होतीच, मात्र न्यायालयीन बाबींना उशीर झाल्याने रायगड दंडाधिकारी यांच्या कडे या प्रकरणी रात्री उशिरा सुनावणी झाली. रात्री सुनावणी झाल्याच्या घटनेकडे कटाक्ष टाकला तर रायगडच्या न्यायालयीन इतिहासात फक्त दोनवेळा रात्री सुनावणी झाली आहे. पहिली सुनावणी रिपब्लिक भारत चे संपादक अर्णब गोस्वामी यांची अलिबागला तर दुसरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची महाडमध्ये सुनावणी झाली.
न्यायव्यवस्थेच्या डोळ्यावर पट्टी असल्याने सर्वाना समान न्याय देण्याची भूमिका गृहीत धरली जाते. विशेषतः
न्यायालयाचे कामकाज हे सायंकाळी रायगडच्या न्यायालयीन इतिहासात दोघांसाठी झाली रात्री सुनावणी पाच वाजता बंद होते. त्यानंतर शक्यतो न्यायालयातील न्यायदानाचे काम होत नाही. तसेच महत्वाचे काही असेल तर न्यायदान केले जाते. रायगड जिल्ह्यात रात्री उशिरा न्यायालय सुरू राहण्याच्या आजपर्यंत दोन घटना घडल्या आहेत. एक अर्णब गोस्वामी प्रकरणात आणि दुसरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या सुनावणीत.
ह्या दोन्ही व्यक्ती महत्वाच्या असल्याने त्यांच्यासाठी न्यायालयात उशिरा पर्यत कामकाज सुरू होते. मात्र महत्वाच्या व्यक्तीला जशी तत्परता दाखवली जाते. अशीच तत्परता ही सर्व सामन्यांसाठीही न्यायालयाने दाखवावी अशी चर्चा या दोन घटनेनंतर सुरू झाली आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने त्याच्या विरोधात महाड मध्ये 24 ऑगस्ट रोजी दाखल झाला आणि गदारोळ माजला.

संगमेश्वर येथून रायगड पोलिसांनी राणे यांना अटक करून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांना सायंकाळी महाड प्रथम न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावून त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. खटल्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी रात्री उशिरा बारा वाजेपर्यत न्यायालय सुरू होते.
अर्णव गोस्वामी याचे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण देखील असेच गाजले. रायगड पोलिसांकडून अटक , न्यायालयात जामीन, सुटका ही प्रक्रिया रात्री उशिरा पर्यँत चालली. अलिबाग तालुक्यातील कावीर येथील अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथून अटक करून अलिबाग येथे आणले होते. यावेळीही मोठा गदारोळ माजला होता. भाजपच्या अनेक आमदारांनी या घटनेचा निषेध केला होता. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी आणि दोघांना अलिबाग न्यायालयात हजर केले होते. या खटल्यात अर्णब गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला होता.
या खटल्यासाठीही रात्री बारा वाजेपर्यत न्यायालय सुरू ठेवण्यात आले होते. ही घटना सप्टेंबर 2020 साली झाली होती. सदर कारवाई व न्यायालयीन प्रक्रियेची बाब देशभर गाजली होती.











Be First to Comment