सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वरम या संस्थेने दिनांक २७ जुलै २०२१ रोजी राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत व्हावी हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. देशभरातील हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत रोहा येथील को.ए.सो. वीणा पंडीत तेंडुलकर इंग्रजी माध्यम शाळेचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी कु. आर्यन संजय आंब्राळे याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
या विशेष कामगिरीबद्दल कु. आर्यन याचा डाॅ. ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन तर्फे सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र व ७५०० रु.( साडे सात हजार रु.) रोख देऊन सन्मान केला आहे. या स्पर्धेसाठी कु. आर्यन याला शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती जोशी तसेच विज्ञान शिक्षिका संगिता गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कु. आर्यन आंबाळेने मिळवलेल्या या दैदीप्यमान यशाबद्दल कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजयभाई पाटील, को.ए.सो.चे संचालक अॅड. हेमंत गांगल , शाळेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष गौरी गांगल तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.








Be First to Comment