Press "Enter" to skip to content

पीपीपी तत्वावर 30 वर्षासाठी जेएनपीटीचे खासगीकरण : कामगार संघटनेत तीव्र असंतोष

सिटी बेल| उरण | विठ्ठल ममताबादे |

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात केंद्र शासनाचा जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा महत्त्वाचा प्रकल्प कार्यरत आहेत. देशात अनेक कंपन्या, प्रकल्पाचे खासगीकरण झाल्यानंतर आता शेवटी जेएनपीटीचे खासगीकरण सुरू झाले आहे.

कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला जेएनपीटीच्या खाजगीकरणाचे ग्लोबल टेंडर निघाले आहे.30 वर्षासाठी पीपीपी तत्त्वावर ग्लोबल टेंडर (निविदा )वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. 18-10-2021हि निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे खासगीकरणाबद्दल कामगारांमध्ये असंतोष पसरला असून केंद्राच्या या कृतीचा विविध कामगार संघटनांनी तीव्र निषेध केला आहे.

जे एन पी टी चे खासगीकरण होऊ नये यासाठी विविध कामगार संघटनांनी तत्कालीन नौकानयन मंत्री मनसूख मांडवीया यांची भेट घेतली होती. त्यांनी जे एन पी टीच्या कंटेनर टर्मिनलचे कधीहि खासगीकरण करू देणार नाही असा शब्द दिला होता. 24/12/ 2020 रोजी झालेल्या बैठकीत खासगीकरणाचा ठराव मांडण्यात आला होता यात हा ठराव 8 विरुद्ध 2 अश्या मतांनी मंजूर झाला होता.


Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.