Press "Enter" to skip to content

तळवली येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तीमय वातावरणात सांगता

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील धार्मिक तथा अध्यात्मिक क्षेत्रात नावाजलेल्या श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी येथे
पिढ्यांन श्रावण मासानिमित्त संपन्न होणा-या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण या धार्मिक सोहळ्याची मोठ्या भक्तीमय वातावरणात सांगता करण्यात आली.

या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वा.सु.नि.गुरूवर्य ह.भ.प अलिबागकर बाबा, धोंडू महाराज कोलाटकर व गोपाळ महाराज वाजे यांचे कृपात्राखाली व ह.भ.प.दत्तूमहाराज कोलाटकर ( मठाधीपति पंढरपूर ) यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व सांप्रदायाचे कोकण प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.मारूती महाराज कोलाटकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी दररोज पहाटे ४ ते ६ काकड आरती, स.८ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक, सायं. ५ वा.प्रवचन,७ वा . सामुदायिक हरिपाठ, रात्रौ.९ वा.हरिकिर्तन, तद्नंतर सामुदायिक जागर भजन आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम धार्मिक वातावरणात संपन्न करण्यात आले.तर सप्ताहाचे शेवटी ता.२१ ऑगस्ट रोजी स.१० ते १२ या वेळेत सांप्रदाय कोकण प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.मारूतीमहाराज कोलाटकर यांचे काल्याचे किर्तन व तद्नंतर महाप्रसाद व सायं. श्रींची पालखी मिरवणूक सोहळयाने या श्रावण सप्ताहाची सांगता करण्यात आली.

या सर्व कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच जय हनुमान क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मोलाच सहकार्य केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.