सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
तालुक्यातील सारडे येथील सारडे विकास मंचच्या माध्यमातून कोमनादेवी ऑक्सिजन पार्क नावारूपाला आले आहे. आता हे ठिकाण पर्यटनस्थळ बनू लागले आहे. या पार्कसाठी अनेक मदतीचे हात पुढे येत असल्याने सारडे विकास मचंचा हुरूप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सारडे विकास मंचला अमोल तेली यांनी सढळ हस्ते १० हजारांची मदत करून खारीचा वाटा उचलला आहे.
कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला भेट दिल्या नंतर त्याठिकाणी केलेलं काम पाहून निसर्ग संवर्धनासाठी इन्टरपोर्ट ग्लोबल लॉजिस्टक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे इम्पोर्ट मॅनेजर अमोल तेली यांनी पाच हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केली होते.
त्यानंतर पुन्हा त्यांनी पाच हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले आहेत. अशा प्रकारे अमोल तेली यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवून 10 हजार रुपये आमच्या सारडे विकास मंचला दिले आहेत. त्याचा योग्य वापर नक्कीच केला जाईल असा विश्वास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला.








Be First to Comment