Press "Enter" to skip to content

डॉ.मनोज भद्रे यांचा निरोप समारंभ व कोरोना योद्धा प्रमाणपत्र वाटप संपन्न

सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू |

इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांची बदली झाल्यानिमित त्यांना निरोप देण्यात आला. तर कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजाविणारे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, नर्स, इतर अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या कोरोना योद्धा प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांची बदली मुबंई याठिकाणी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. मनोज भद्रे यांनी गेली अनेक वर्षे उरणकरांची सेवा केली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वांशी सबंध चांगले होते. अधिकारी बोलल्यानंतर काही वर्षानंतर त्यांची बदली ही होणारच असते.

डॉ. भद्रे यांना निरोप जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत, सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, पोलीस अधिकारी विक्रम जगताप, संदीपण शिंदे, डॉक्टर असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास मोरे, डॉ. सत्या ठाकरे, डॉ. सुरेश पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना शासनातर्फे देण्यात आलेला कोरोना योद्धाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. मनोज भद्रे यांनी गेली अनेक वर्षे इमानदारीने रुग्णांची सेवा केली आहे. त्यामुळे त्यांचे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांशी सबंध सलोख्याचे होते असे सांगत त्यांना परत उरणला येण्याचे आवाहन केले. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी आपण त्यांची बदली लगेच स्थगित करण्यास तयार आहोत, त्यांनी फक्त सांगावे असे सांगत त्यांना कधी वाटेल तेव्हा त्यांनी सांगावे त्यांना पुन्हा उरणला आणू असा विश्‍वासही यावेळी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना डॉ. मनोज भद्रे हे भारावून गेले होते. त्यामध्ये त्यांनी आपण डॉक्टर क्षेत्रात अपघातानेच आल्याचे सांगत आपण पैशापेक्षा आपल्या सेवेला महत्व दिले. त्यामुळेच रुग्णांची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. उरणमध्ये सर्व क्षेत्रात माझे सबंध चांगले होते. त्यामुळे या ठिकाणी काम करण्यास अडचण भासत नसल्याचे सांगितले.

यानंतर कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा केल्याबद्दल राज्यशासनातर्फे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, नर्स, इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे कोरोना योद्धा पुरस्काराने अनेकांना गौरविण्यात आले. यावेळी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.