Press "Enter" to skip to content

घर घेणा-यांनो रहा सावध : द्रोणागिरी नोडमधील बिल्डरलॉबी कडून नियमांची पायमल्ली

अधिकृत कागदपत्रे पाहूनच बुकिंग करावे अन्यथा नंतर पश्‍चाताप करण्याची येईल वेळ !

सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू |

सिडकोच्या माध्यमातून उरण शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर द्रोणागिरी नोडची निर्मिती सुरू आहे. या नोडमध्ये बिल्डरांनी इमारतींचे जाळे उभे केले आहे. परंतु बहुतांश बिल्डरांकडून दिलेल्या नियमांची पायमल्ली करून इमारती उभ्या करण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक बॅनरबाजीचे फलक नाक्यांनाक्यावर लावले जात आहेत. तरी ग्राहकांनी अशा आमिषाला बळी न पडता अधिकृत कागदपत्रे पाहूनच बुकिंग करावे अन्यथा नंतर पश्‍चाताप करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

द्रोणागिरी नोडमधील भूखंड सिडकोकडून घेऊन बिल्डरांनी इमारती उभ्या करण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक बॅनर बनवून दे मेन नाक्यावर लावले जातात. अशा बॅनरबाजीला भुलून अनेकांनी बिल्डरांच्या कार्यालयात जाऊन संपर्क साधतात. यावेळी कार्यालयात त्यांची व्हीआयपी खातरजमा केली जाते. त्यावेळी मधापेक्षा गोड असणारी माणसं ग्राहकांना भुलवुन त्यांना घेण्यास भाग पाडतात.

ग्राहकांनी एकदा का टोकन टाकले की मग ते ग्राहकांना थापा मारण्याचे काम करीत वेळ मारून नेतात. त्यामुळे खरेदी करणारा ग्राहक वैतागून जातो परंतु ठराविक रक्कम दिल्याने त्याचा नाईलाज होतो. कारण सदर बुकिंग पूर्ण झाल्याशिवाय इमारत बाधकामांस सुरुवात होत नाही.याचाच अर्थ फक्त नाव बिल्डरचे परंतु सर्व पैसा गाहकांचा असतो.

द्रोणागिरी नोडमध्ये इमारतींचे बांधकाम हे घेतलेल्या नियमानुसार करणे बंधनकारक असतानाही बहुतांश बिल्डर हे नियमांची पायमल्ली करून इमारत उभ्या करीत आहेत. इमारतींचे बांधकाम सुरू असताना परवानगी देणार्‍या डिपार्टमेंटच्या अधिकारी वर्गाची देखरेख गरजेची अस्तानाही यावर कोणा अधिकारी वर्ग ढुंकूनही पहात नसल्याचे दिसून येते.

या संदर्भात बोकडविरा येथील सदर विभागाच्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधून विचारणा केली असता ते जबाबदारी झटकत बिल्डरांच्या बांधकामांशी आमचा सबंध येत नसल्याचे सांगून मोकले होतात. याचाच फायदा बिल्डरांनी उचलत निकृष्ट दर्जाचे व नियमांची पायमल्ली करून बांधकाम उभारत आहेत. याचे दुष्परिणाम काही ठिकाणी दिसू लागले आहेत. तर ज्यावेळी रेल्वे सुरू होईल व वर्दळ वाढेल त्यावेळी नक्कीच दुर्घटना घडण्याची शक्यता भूगर्भ तज्ञांनी व्यक्त केली आहे.

तरी द्रोणागिरी नोडमध्ये बिल्डरांकडून सदनिका अथवा गाळा खरेदी करताना अधिकृत कागदपत्रे पाहूनच खरेदीचा व्यवहार करावा अन्यथा नंतर डोक्याला हात लावण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा सारासार विचार खरेदी करणार्‍या ग्राहकांनी करावा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.