सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
राज्यभरात डेंग्यू व मलेरियाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.हि बाब अत्यंत चिंताजनक आहे.रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोकरपाडा येथील हिरानंदानी फाॅरच्यून सिटीमध्ये डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत.तेथील सिक्युरिटी गार्ड, रहिवासी हे कामानिमित्त आजुबाजूच्या परिसरात वावरत असतात तसेच तेथील कामगार वसाहतीत मोठ्या संख्येने कामगार राहत आहेत.ते मोहोपाडा ते आजूबाजूच्या गावांमध्ये खरेदी करीता जात असतात.विशेष करुन रविवारी मोहोपाडा येथील बाजारपेठेत त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो.यामुळे डेंग्युचा प्रसार परिसरातील गावांमध्ये होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हि बाब गंभीर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी यांच्या लक्षात येताच त्यांनी हिरानंदानी फाॅरच्यून सिटीचे व्यवस्थापक नागनाथ शिंदे यांची भेट घेऊन वसाहतीमध्ये किटक नाशक फवारणी तसेच आरोग्य अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार योग्य ती उपाययोजना लवकरात लवकर करावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.यावेळी मनसे पदाधिकारी विशाल निंबाळकर उपस्थित होते.








Be First to Comment