Press "Enter" to skip to content

महालन प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे रक्षाबंधन पोलीस बांधवांसोबत

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महालन प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उरण पोलिस स्टेशन मध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थापक अध्यक्षा कै. वासंती ठाकुर मॅडम यांच्या कार्याचे , विचारांचे समरण तसेच संस्थेची ओळख अध्यक्षा सीमा अनंत घरत यांनी उपस्थितांना करून दिली.

यावेळी संस्थेचे सचिव संध्या ठाकुर,नयना नारायण पाटील, सामिया बुबेरे, वुमन क्लब अध्यक्षा नयना ठाकुर व पदाधिकारी उपस्थित होते.पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरी करण्याचे संस्थेचे हे 21 वे वर्षे आहे.पोलिस समाजाचे रक्षण करतात आणि ड्युटी वर असल्याने त्यांना गावी जाता येत नाही. अनेक महत्वाचे सण पोलीस बांधवांना साजरे करता येत नाही. प्रथम जनतेची सुरक्षा हे तत्व पाळून ते जनतेची सेवा करतात.त्यामुळे समाजाचे रक्षा करणाऱ्या या पोलीस बांधवांचे महालन प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी पोलीस अधिकारी कर्मचारी बांधवाना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली जाते.

उपस्थित उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत, पोलीस हवालदार -शैलेश कोळी, पोलीस नाईक -रवींद्र पार्टे (उरण वाहतूक शाखा ), पोलीस नाईक -संदीप पाटील, शशिकांत घरत, पोलीस कॉन्स्टेबल -कोकाटे आदी पोलीस अधिकारी -कर्मचारी यावेळी उपस्थित होते. पोलीस बांधवांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांचे आभार मानले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.