सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठीजुई ता. उरण या शाळेत भारतीय हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविणारा व बहीण भावाच्या नात्याचे पावित्र्य जपणारा रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून दि 20/8/2021 पासून अनुभवातून शोधू या विज्ञानाचे झरे अंतर्गत सखी हा उपक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत बहिणीने भावाचे औक्षण करून राखी बांधणे व भावाने बहिणीला तुळशीचे रोप भेट देणे,मैत्री पर्यावरणाशी ही भावना व झाड हे देखिल आपला भाऊच आहे ही जाणीव मनी ठेवून झाडांना राखी बांधणे, रोपभिशी व वृक्ष संरक्षण व संगोपन इ उपक्रम राबविण्यात येत आहेत.याचाच एक भाग म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षाला राखी बांधत पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केल्याची माहिती शाळेचे उपक्रमशिल शिक्षक संजय होळकर यांनी दिली.

या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर पाटील,मुख्याद्यापक सुभाष म्हात्रे ,सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी सामाजिक अंतर व कोरोना नियम पाळून उपस्थित होते.








Be First to Comment