पोर्टेबल एक्स-रे मशीन बसविण्यासाठी युपीएस केबल व वातानुकूलित सुविधा सुरु करण्याची नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे व सिडको कडे मागणी
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका होऊ नये यासाठी दक्षता विभाग, एनआयसीयू व जनरल वॉर्ड साधनसामग्रीसह सुरू करण्याची मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व सिडको यांच्याकडे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी केली आहे.
उरण तालुक्यामध्ये सिडकोच्या माध्यमातून बोकडविरा, उरण येथे ५० बेडचे हॉस्पिटल उभे केले आहे. कोविड १९ विषाणूची दुसऱ्या लाटेच्या सुरवातीला रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी ऑक्सिजन बेडची व्यवस्था सिडकोच्या माध्यमातून केल्यामुळे उरण वासियांना दुसऱ्या लाटेपासून दिलासा मिळाला. तसेच कोविड १९ विषाणूची संभावीत तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका होऊ नये याकरिता पूर्वतयारी म्हणून लहान मुलांचे ०८ खाटांचे अतिदक्षता विभाग, ०५ खाटांचे एनआयसीयु व १५ खाटांचे जनरल वॉर्ड आवश्यक साधनसामुग्रीसह सुरु करावे तसेच कोविड रूग्णांसाठी एक्स-रे मशिन उपलब्ध असून ती मशिन कार्यान्वित करण्यासाठी युपीएस केबल व वातानुकूलित यंत्रणा तातडीने सिडकोच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी केली. त्याच अनुषंगाने मंत्री महोदयांकडून व व्यवस्थापकीय संचालक सिडको यांना आदेश देण्यात आले.
त्याचदृष्टीने सिडकोचे सह-व्यवस्थापकिय संचालक कैलाश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सोबत कॉंग्रेसचे नेते तथा इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार उपस्थित होते.









Be First to Comment