सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
आजच्या विज्ञान आणि फँशनच्या युगात मुला – मुलींनी प्रत्येक बाबतीत सजग राहून तसेच एखाद्या गोष्टीचे अति आहारी न जाता आई-वडील व घरादाराची मर्यादा सांभाळून वागणे काळाची गरज असल्याचे वक्तव्य ह.भ.प.संकेतमहाराज डेरे मांजेरी-महाड यांनी रोहे तालुक्यातील श्री क्षेत्र तळवली येथे आपल्या किर्तनरूपी सेवेप्रसंगी व्यक्त केले.
वै.गु.अलिबागकर महाराज, गोपाळबाबा व धोंडूबाबा यांच्या क्रुपाशिर्वादाने व ह.भ.प.दत्तूमहाराज कोलाटकर व ह.भ.प मारूतीमहाराज कोलाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक पिढ्यांपासून संपन्न झालेल्या या सप्ताह प्रसंगी आपल्या हरिकिर्तनरुपी सेवेप्रसंगी भाविकांना उद्बोधन करताना संकेतमहाराज बोलत होते.
यावेळी संजय जाधव,राजू पवार, भगवान पवार, प्रकाश जाधव, मोतीरामजी पवार, सुजित डांगे,सुतार महाराज,संजय जाधव आदी मांजेरी येथीलजेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच खांब पंचक्रोशीचे कृष्णा जाधव, प्रकाश थिटे,ज्ञानेश्वर लोखंडे, राम लोखंडे, तुकाराम महाडिक, नारायण लोखंडे आदी भाविकभक्त उपस्थित होते.
Be First to Comment