Press "Enter" to skip to content

उरण शहरातील पोस्ट ऑफिस जेएनपीटी मध्ये स्थलांतरित : उरण शहरातील नागरिकांचा विरोध

ज्येष्ठ नागरिक, अपंग,महिला, महाविद्यालय विद्यार्थी, व्यापारी, कामगार वर्गात नाराजी



सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उरण शहरातील गोरगरीब जनता, कामगार,ज्येष्ठ नागरिक अपंग, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी वर्ग यांच्यासाठी सर्वात जवळ व उत्तम व्यवहारासाठी पोस्ट कार्यालय एक उत्तम माध्यम आहे.मात्र हे पोस्ट कार्यालय उरण शहरातून जेएनपीटी येथे स्थलांतरित झाल्यामुळे उरण शहरातील ज्येष्ठ नागरिक, अपंग, महिला, महाविद्यालय विद्यार्थी,व्यापारी, कामगार वर्गाची खूप मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत असून या सर्वांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

उरण शहरात कोटनाका येथे अनेक वर्षापासून पोस्ट ऑफिस कार्यालय कार्यरत आहे. मात्र पोस्ट ऑफिस ज्या इमारतीमध्ये कार्यरत आहेत ते इमारत जुने असून धोकादायक व मोडकळीस आलेले आहे. त्यामुळे या पोस्ट ऑफिसमध्ये कामाला जाणारा ग्राहक, कामगार, व्यापारी वर्ग, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयातील विद्यार्थी, अपंग महिला यांच्या जीवितेला खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे.जीवितहानी होण्याचीहि शक्यता नाकारता येत नाही.शिवाय पोस्ट ऑफिस मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता यामुळे सदर पोस्ट कार्यालय सध्या जेएनपीटी मध्ये स्थलांतरित झाले आहे.


उरण शहरापासून जे.एन.पी.टी पाच ते सहा किलोमीटर वर आहे.जे एन पी टी मध्ये आता उरण शहरातील पोस्ट कार्यालय स्थलांतरित झाल्याने उरण शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना पोस्टातील दैनंदिन व्यवहारासाठी पाच-सहा किलोमीटर दूर असलेल्या जे एन पी टी मध्ये जावे लागत आहे.उरण शहरातून जे एन पी टी येथे जाण्यास वेळेत रिक्षा, बस, टॅक्सी मिळत नाही. शिवाय वेळही जास्त लागतो.त्यामुळे उरण शहरातील नागरिकांना वेळ पैसा श्रम हे जास्त प्रवास खर्च करावे लागत आहे शिवाय नागरिकांना महत्त्वाची कामे वेळेवर होण्यास विलंब होत आहे.

आठवड्यातील पाच दिवसच पोस्ट कार्यालय उघडे राहणार आहे. इतर दिवस ते बंद असणार आहे त्यामुळे नागरिकांचे खूप मोठे हाल होत आहेत.पोस्ट कार्यालयावर, पोस्टाच्या व्यवहारावर नागरिकांचा खूप मोठा विश्वास आहे. भविष्यात पोस्ट ऑफिस मधील व्यवहारात वाढ होणार आहे. बँका, शाळा प्रमाणेच पोस्ट कार्यालय हेही आता अत्यावश्यक सेवा बनली आहे.


तहसील कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती, उरण पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी शासनाचे महत्त्वाचे विविध शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालय, महामंडळाचे कार्यालय हे उरण शहरांमध्ये असल्याने उरणमधील विविध कंपनीचे कर्मचारी,व्यापारी, कामगार,शासकीय कर्मचारी, महिला,अपंग, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थांनी पोस्ट ऑफिस उरण शहरातच नवीन प्रशस्त ठिकाणी सुरू करावे,उरण शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी पोस्ट कार्यालय हलवू नये अशी मागणी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.