सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरणचे सुपुत्र कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी अमित सदानंद शेलार यांची बदली नवी मुंबई मधून थेट दहशतवादी विरोधी पथक मुंबई (ATS ) महाराष्ट्र येथे स्पेशल फोर्स मध्ये झाली आहे. कर्तव्यदक्ष असलेल्या अमित शेलार यांच्या कार्याची दखल घेत त्यांची निवड दहशतवादी विरोधी पथकात झाल्याने विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत अमित शेलार यांनी उरण पोलीस ठाणे, कामोठे पोलीस स्टेशन, रबाळे पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक (PSI ) या पदावर काम केले.तसेच अँटी नार्कोटिक्स विभाग, क्राईम ब्रँच, सेंट्रल युनिट आदी विभागात देखील काम केले. अमित शेलार यांनी सर्वच ठिकाणी आपली उत्तम छाप पाडली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आजपर्यंत विविध पुरस्कारांनी त्यांना अनेकवेळा शासनाने तसेच विविध संस्था, संघटनांनी गौरविले आहे. आता त्यांची नियुक्ती दहशतवादी विरोधी पथक मुंबईच्या स्पेशल फोर्स मध्ये झाल्याने सर्व स्तरातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment